Tulshibaug Ganpati: पुण्यातील मानाचा चौथा गणपती असलेला तुळशीबाग गणपतीचा महाकालेश्वर मंदिर देखावा!
पुण्यातील मानाचा चौथा गणपती असलेला तुळशीबाग गणपती मंडळाची यंदा १० वाजता राम मंदिर येथून पालखीमधून मिरवणुकीला सुरुवात होईल. तिथून पुढे बाबू गेणू चौक, जिलब्या मारुती चौक, शनिपार चौक येथून गणपती चौक आणि पुढे उत्सव मंडपात बाप्पा विराजमान होणार आहेत. पुणे मर्चंटचे अध्यक्ष राजेंद्र बाटिया आणि उद्योजक राजेश शाह यांच्या हस्ते ११.३० वाजता प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. या मंडळाकडून यंदा उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराचा देखावा साकारण्यात येणार आहे.