Dagdusheth Ganpati 2023: ढोल ताशांच्या गजरात दगडूशेठ बाप्पाचं आगमन, रथामधून बाप्पा उत्सवमंडपात दाखल
गणेशोत्सवाला सुरवात झाली असून घरोघरी बाप्पाचे आगमन झाले आहे. पुण्यातील प्रमुख गणपतींपैकी एक गणपती म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती. दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आकर्षक सजावट करून गणेशोत्सवाला सुरवात झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते बाप्पाची पूजा करण्यात येत आहे.