Devendra Fadnavis on Ganesh Festival: गणेशोत्सवाला (Ganesh Utsav) सुरवात झाली असून घरोघरी बाप्पाचे आगमन झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याही मुंबईतील सागर बंगल्यावर गणपती बाप्पांची (Ganpati Bappa) स्थापना करण्यात आली. यावेळी माध्यमांशी बोलताना फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, “बाप्पाचा आशीर्वाद महायुतीच्या पाठीशी आहे”. यावेळी फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी गणरायाला साकडेही घातले.