Pune Ganpati 2023: राज्यभरात आज गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi) उत्साह पाहायला मिळत आहे. पुण्यातही हा जल्लोष कायम आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मानाच्या चार गणपतींची थाटात मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरामुळे श्रींच्या मिरवणुकीतील उत्साह आणखी शिगेला पोहोचला होता. पारंपरिक मिरवणुकीनंतर बाप्पांची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. दरम्यान, टिळक पंचांगानुसार ऑगस्ट महिन्यातच मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपतीचं (Ganpati) आगमन झालं होतं.