गणरायाचं आगमन होऊन सात दिवस झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे शहरातील मानाचा पहिला कसबा गणपतीचे दर्शन घेतले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानाचा पहिला कसबा गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर शहरातील अन्य प्रमुख मंडळाना भेट देखील दिली.