Ganesh Visarjan Pune: विसर्जन मार्गावर राष्ट्रीय कला अकादमीकडून सायबर क्राईमच्या संकल्पनेवर रांगोळी!
पुण्यातील गणेशोत्सवामधील विसर्जन मिरवणुकीकडे पुणेकर नागरिकांचे दरवर्षी लक्ष लागून असते. या मिरवणुकीत शहरातील विविध संस्था आणि संघटना मिरवणुक पाहण्यास येणार्या नागरिकांना सेवा देण्याचं काम करत असतात. त्यापैकीच पुण्यातील राष्ट्रीय कला अकादमी ही संस्था २५व्या वर्षात पदार्पण करत आहेत. या संस्थेमार्फत आजवर मंडई चौक ते अलका टॉकीज चौका दरम्यान येणार्या ११ चौकात सामाजिक विषयावर रांगोळ्या साकारून नागरिकाचे प्रबोधन करण्याचं काम केले आहे. यंदाच्या वर्षी देखील ही परंपरा कायम राखत सायबर क्राईमवर आधारित भव्य अशा रांगोळया साकारल्या आहेत. तर या पुणेकर नागरिकांनी रांगोळ्या पाहण्यास एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.