Pune Ganesh Visarjan: ढोल ताशांसह टाळ-मृदुंगाची परंपरा जपत तुळशीबाग गणपती विसर्जनासाठी रवाना!
पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुक मोठ्या जल्लोषात सुरू आहे. मानाचा चौथा गणपती असलेले तुळशीबाग गणपती मंडळ. इतर मानाच्या गणपतींप्रमाणेच या गणपतीचीही मिरवणूक जल्लोषात सुरू आहे. पारंपरिक वारकरी संप्रदायाच्या टाळ-मृदुंगाच्या तालावर ठेका धरला गेला. या मिरवणुकीमध्ये अनेक लहान मुलं शिवराय, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांसारख्या महापुरुषांच्या वेशभूषेत दिसून आले.