Dagdusheth Ganpati Visarjan: दगडुशेठ गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीने गणेशोत्सवात घालून दिला आदर्श
गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्ट मार्फत विसर्जन मिरवणुकीत दुपारी चार वाजता सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला होता.ठरलेल्या नियोजित वेळेनुसार दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मुख्य मंडपामधून मिरवणुकीला सुरुवात झाली.त्याच दरम्यान जोरदार पावसाने हजेरी लावली. तरी देखील त्याच उत्साहात विसर्जन मिरवणुक बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणुक पुढे मार्गस्थ झाली आणि ८ वाजून ५० वाजता गणपतीचे पांचाळेश्वर मंदिर घाटावर विसर्जन करण्यात आले.