Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणेशविसर्जनाची अखेर सांगता!; तब्बल २८ तासांनी संपली विसर्जन मिरवणूक
लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेल्या लाखो पुणेकरांच्या उपस्थितीत ढोल ताश्यांच्या गजरात पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला कसबा गणपतीची पारंपरिक पद्धतीने पालखीमधून काल गुरुवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर आज दुपारी ३.१० वाजता अखेरचा महाराष्ट्र तरुण मंडळाचा गणपती अलका टॉकीज चौकातून पुढे मार्गस्थ झाला. त्यानंतर प्रशासनाने विसर्जन मिरवणुक संपल्याचं घोषित केलं. लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड आणि टिळक रोड या मार्गाने २०० हून अधिक गणेशमंडळ विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाली होती.