Tembe Ganpati Visarjan: माजलगावच्या मानाच्या टेंबे गणपतीचं विसर्जन, हातात टेंबे घेऊन भाविकांचा जल्लोष
बीडच्या माजलगावातील मानाच्या टेंबे गणपतीचं शनिवारी (३० सप्टेंबर) मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आलं. भाद्रपद एकादशीला या गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. त्यानंतर पाच पाच दिवसांनी लाडक्या बाप्पाचं विसर्जन केलं जातं. त्यानुसार शनिवारी टेंबे गणपतीची
पारंपरिक टेंबे मिरवून मिरवणूक काढण्यात आली. माजलगावातील मानाचा आणि ऐतिहासिक वारसा असणारा हा गणपती आहे. विसर्जनादरम्यान भाविक हातात टेंबे घेऊन विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात. दहा दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर या टेंबे गणपतीचं विसर्जन केल जातं. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व असे विविध देखावे उभारण्यात आले होते.