पुण्यातील पहिल्या मानाच्या कसबा गणपतीचं जल्लोषात आगमन झालेलं आहे. पारंपरिक ढोल, ताशांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा एक संकल्प केला आहे. देशात वाढलेल्या महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे संताप व्यक्त केला जात आहे. महिला सुरक्षेचा
मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या दृष्टीकोनातून मंडळाने अनोख्या संकल्पाचा निर्धार केला आहे.