अभिनेता सुबोध भावेच्या घरी दीड दिवसाच्या गणपतीचं आगमन झालं आहे. यावेळी सुबोध भावेनं काश्मीर येथील गुलमर्गमधील गंडोलाची प्रतिकृतीचा देखावा उभारला आहे. तसंच सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्यात सणाचं, उत्सावाचं स्वरुप कसं असावं हे पुणेकरांनी एकत्र येऊन ठरवण्याची गरज आहे, असा संदेशही सुबोध भावेने दिला.