गणेशोत्सवानिमित्त राजकीय नेत्यांच्या निवासस्थानीही लाडक्या गणरायाचं आगमन झालं आहे. यावेळी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी काही राजकीय चर्चा झाली का? असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. त्यावर आव्हाडांनी मिश्कीलपणे उत्तर दिलं आहे.