पुण्यासह राज्यभारात सध्या गणेश उत्सवाची धामधूम पाहायला मिळतीये. पुण्यातल्या गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण हे गणेशोत्सवातले देखावे असतात. पुण्यात सार्वजनिक गणेश उत्सवाबरोबर घरगुती गणेशोत्सवाचे देखावे सुद्धा मोठे आकर्षक असतात. असाच एक देखावा पुण्यात सादर करण्यात आलाय. ज्या व्यक्तीच्या आंदोलनाने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले त्या मनोज जरांगे पाटलांचा देखावा तसेच त्यांच्या मराठा आंदोलनाचा सगळा प्रवास या देखाव्यातून या ठिकाणी सादर करण्यात आलाय.