ग्लोबल वॅार्मिंग म्हणजेच जागतिक तापमानवाढ ही जगाला भेडसावणारी मोठी समस्या आहे. वातावरणात होणारे बदल, कार्बन उत्सर्जन याविषयी अनेकदा देश आणि जागतिक पातळीवर चर्चा केली जाते. मात्र, ही समस्या सोडवण्यासाठी एक सामान्य व्यक्ती काय योगदान देऊ शकते? हाच विचार करून पुण्यातील प्राची शेवगांवकर हिने ‘कूल द ग्लोब’ या मोबाईल अॅपची निर्मिती केली आहे. तिचं हे अॅप ११० देशांमध्ये सध्या वापरलं जात आहे. या माध्यमातून गेल्या २ वर्षांत २५ लाख किलो कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत झाली आहे.