डॉ. अभिजीत सोनवणे भीक मागणाऱ्या आजी, आजोबा आणि त्यांच्या मुला, मुलींचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या सात वर्षापासून डॉ. सोनवणे हे भिक्षेकऱ्यांपर्यंत मोफत औषधोपचार पोहोचवण्याचं काम करत आहेत. या सामाजिक कार्यात अभिजीत यांच्या पत्नी डॉ. मनीषा सोनवणे देखील त्यांना साथ देत आहेत. स्वतः बरोबर घडलेल्या एका घटनेनंतर अभिजीत यांनी आपली आंतरराष्ट्रीय कंपनीतील प्रमुख पदावरील नोकरी सोडून अशा दुर्लक्षित आणि दुर्बलांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा रंजक प्रवास मुलाखतीतून जाणून घेऊ या.