कल्पना निकम या गेल्या १६ वर्षांपासून कल्याण एसटी आगारात बसगाड्यांच्या दुरुस्तीचं काम करत आहेत. कारागिर ‘क’ यांत्रिक बहुव्यवसायिक या पदावर रुजू होणाऱ्या त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला कर्मचारी आहेत. टायर बदलणे असो वा इंजिन दुरुस्तीचं काम असो कल्पना अगदी योग्य पद्धतीने करतात. २००७ मध्ये राज्य परिवहन महामंडळात रुजू झाल्यानंतर सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना त्यांना करावा लागला. हे अवजड काम महिलांचं नाही, असे टोमणेही त्यांनी ऐकले. परंतू मेकॅनिक वडिलांकडून त्यांना मिळालेली प्रेरणा या सगळ्या अडथळ्यांवर मात करणारी ठरली. आज गाडीच्या प्रत्येक भागाविषयी त्या अगदी अचूकपणे माहिती सांगू शकतात आणि ते दुरुस्तही करु शकतात. त्यांचा हा रंजक प्रवास जाणून घेऊ या.