चंद्रकात बुध्या घाटाळ हे आदिवासी समाजातील खगोल अभ्यासक आहेत. २०१५ साली त्यांनी पालघर जिल्ह्यातील कासा येथे पहिलं अवकाश निरिक्षण केंद्र स्थापन केलं. असं अवकाश निरिक्षण केंद्र सुरू करणारे ते भारतातील पहिले आदिवासी व्यक्ती असल्याचा त्यांचा दावा आहे. या केंद्रात ग्रामीण भागांतील मुलांना मोठमोठ्या टेलिस्कोप व इतर विज्ञानाच्या साहित्याद्वारे अवकाश निरिक्षण माहिती व प्रशिक्षण अगदी विनामूल्य दिलं जातं. शहरात जाऊन खगोलीय ज्ञान घेणं या मुलांना शक्य नाही. त्यामुळ त्यांच्यासाठी आपण इथेच अवकाश निरीक्षण केंद्र तयार करण्याचा निर्णय चंद्रकांत यांनी घेतला. आतापर्यंत शाळा व महाविद्यालयातील जवळपास १० हजार मुलांनी या केंद्राला भेट दिली आहे. त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास एकदा पाहाच…