पंढपुरच्या मंगल शहा (७१ वर्ष) या गेल्या ५० वर्षांपासून समाजकार्यात कार्यरत आहेत. पंढरपुरमध्ये एड्स बाधित मुलांसाठी त्यांचं काम सुरू आहे. २००१ साली प्रभा हिरा प्रतिष्ठान अंतर्गत ‘पालवी’ प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या समाजकार्याला त्यांनी नवी ओळख दिली. समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर ठेवल्या गेलेल्या या मुलांनाही आरोग्य, शिक्षण आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. या हेतून मंगल शहा यांचं समाजकार्य सुरू आहे. एड्स बाधित मुलांसह मनोरुग्ण महिला, वयोवृद्धांसाठीही संस्था काम करते. शुन्य ते १८ वर्ष एड्स बाधित मुलांसाठी काम करणारी ही महाराष्ट्रातील सध्या एकमेव संस्था आहे.