ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात २०० हून अधिक विविध पशू-पक्ष्यांचे आवाज काढणारा अनोखा अवलिया कार्यरत आहे. सुमेध वाघमारे असं त्यांचं नाव असून त्यांना ताडोबातील ‘बर्डमॅन’ म्हणून ओळखलं जातं. सुमेध वाघमारे हे चिमणी, कावळा, मोर, लांडोर, कोंबडी, कोकीळा, रानम्हैस, रानगवा अशा विविध पशू व पक्ष्यांचे आवाज काढून पर्यटकांना याबद्दल माहिती देतात. या कलेच्या माध्यमातून ते निसर्गाला वाचविण्याचा संदेश कसा देतात हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडीओ पाहा.