मुंबईत राहणारा २५ वर्षीय वरुण सावंत हा आशियातील पहिला स्वमग्न (ऑटिस्टिक) मॅरेथॅान धावपटू आहे. वरुणने २०२० सालच्या टाटा मुंबई मॅरेथाॅनमध्ये ४४ किमीचं अंतर चार तास आणि २७ मिनिटांत पूर्ण करून नवा विक्रम रचला होता. टाटा मुंबई मॅरेथॅान असो किंवा शहराबाहेरच्या मॅरेथॉन स्पर्धा असो वरुण त्यात उत्साहाने सहभाग घेत असतो. वरुणने हॅाटेल मॅनेजमेंटमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं असून लॅाकडाऊनमध्ये त्याने आपला बेकरी व्यावसायही सुरू केला. ऑटिझममुळे निर्माण होणाऱ्या अडथळ्यांवर मात करून वरुण आपली एक वेगळी ओळख निर्माण करत आहे.