वसईच्या भुईगाव येथील विकास वझे (Vikas Vaze) हे आधुनिक पद्धतीने खेकड्याची शेती करत आहेत. आयटीआयमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिंद्रा आणि पार्ले सारख्या नावाजलेल्या कंपनीत विकास यांनी नोकरी केली. पण वेगळं काहीतरी करायचं म्हणून त्यांनी २०१६ साली खेकड्याची शेती करण्याचा निर्णय घेतला. वर्टिकल बॅाक्स क्रॅब फार्मिंग (vertical Box Crab Farming) असा प्रयोग करत विकास यांनी खेकडा शेतीला आधुनिकतेची जोड दिली. सध्या त्यांच्याकडे १००० खेकड्यांची संख्या असून महाराष्ट्रासह देशात आणि परदेशातही त्यांची निर्यात केली जाते.