दादासाहेब भगत हा मुळचा बीडचा. शेतकरी कुटुंबातील दादासाहेब भगत हा तरुण त्याच्या शार्क टॅंक इंडियातील सहभागामुळे चर्चेत आला आहे. ‘बोट’ सारख्या नामांकित कंपनीचे मालक अमन गुप्ता यांच्याकडून त्याला १ कोटीच्या गुंतवणुकीची ऑफर मिळाली आहे. दहावीनंतर आयटीआयचं शिक्षण घेतलेला दादासाहेब २००६ साली इन्फोसिस कंपनीत ऑफिस बॅाय म्हणून कामाला होता. तिथे असताना संगणकावर केली जाणारी कामं पाहून त्यानेही ग्राफिक्स डिझायनिंग, प्रोग्रामिंग शिकून घेतलं. दरम्यान एका अपघातामुळे त्याला गावी परतावं लागलं. मात्र इथेच तो थांबला नाही तर design template.io नावाचं स्टार्टअप सुरू केलं. हे ऑफिस त्याने चक्क गोठ्यातच सुरू केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील त्याच्या या स्टार्टअपचं कौतुक केलं होतं. त्याचा हा असामान्य प्रवास जाणून घेऊया.