परेल येथे स्थायिक असणारे ८५ वर्षीय मुरारी पांचाळ गेल्या ३० वर्षांपासून एसटी प्रवाशांची अनोख्या पद्धतीने मदत करत आहेत. मुरारी पांचाळ हे दादरच्या एसटी बस थांबा येथे येणाऱ्या प्रवाशांना एसटीची वेळ, कोणती एसटी कुठे? कोणत्या मार्गे जाते? याची सर्व माहिती देत असतात. अनेकदा ऐनवेळी एसटी बसची माहिती काढताना प्रवाशांची दमछाक होते. अशावेळी मुरारी पांचाळ हे प्रवाशांच्या मदतीला धावून जातात. पांचाळ यांनी एसटी प्रवाशांना मदत करण्याचा निर्धार करण्यामागे एक घटना कारणीभूत ठरली होती. ती घटना काय होती? त्यांचा हा असामान्य प्रवास जाणून घेऊ या.