मॉडेलिंग एक असं क्षेत्र आहे जिथे तुमचं दिसणं, शरीरयष्टी, व्यक्तिमत्त्व या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. जिथे सौंदर्याची एक साचेबद्ध प्रतिमा तयार करण्यात आली आहे. मात्र ही चौकट मोडून या क्षेत्रात मुंबईच्या मिताली सोनवणे हिने स्वतः ला सिद्ध केलं आहे. वयाच्या पाचव्या वर्षी एका अपघातात मिताली गंभीररीत्या भाजली होती. मात्र लहानपणापासूनच नृत्यू आणि अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचं तिचं स्वप्न होतं. या अपघातानंतर तिला अनेकांनी मॉडेलिंग क्षेत्रात जाऊ नको, असा सल्ला दिला. परंतु आपल्या शरीरावरील व्रण आपल्या स्वप्नांच्या आड येऊ न देता मितलीने मिस इंडिया आणि मिस फेमिना सारख्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि भारतातील पहिली इन्स्पायारींग मॉडेल होण्याचा बहुमान मिळवला. तिच्या याच असामान्य प्रवासाची गोष्ट पाहा…