बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे राहणाऱ्या वनिता बोराडे या गेल्या ३५ वर्षांपासून वन्यजीव संरक्षक आणि सर्पमित्र म्हणून कार्यरत आहेत. २०१४ साली वनिता यांनी ५१ हजारांपेक्षा जास्त साप वाचवून विश्वविक्रम प्रस्थापित केला व जगातील पहिली महिला सर्पमित्र तथा सर्परक्षक होण्याचा बहुमान मिळवला आहे. सापांबद्दल असलेली भीती, अंधश्रद्धा याविषयी जनजागृतीचं काम त्या आपल्या कार्यशाळेच्या माध्यमातून करत असतात. त्यांचा हा असमान्य प्रवास जाणून घेऊ