उच्च शिक्षणानंतर अनेकजण परदेशात जाणं पसंत करतात किंवा शहरात आपला व्यवसाय थाटतात. मात्र यालाच छेद देत एका उच्चशिक्षित तरुणीने गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला. वर्षा मरकड असं या तरुणीचं नाव आहे. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील मढी या गावची ती रहिवासी आहे. वर्षाने एमबीए पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं असून पुढे नोकरी न करता गोवंश संवर्धनाचा निर्धार तिनं केला आहे.