प्रवीण तुळपुळे या नौदलाच्या माजी अधिकाऱ्यानं नोकरीचा राजीनामा देत २००१ साली वैद्यकीय विदूषक (Medical Clown) होण्याचा निर्णय घेतला. अर्थात या मागे एक घटना कारणीभूत ठरली. रुग्णालयातील आजारी मुलं, वृ्द्धाश्रमातील आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर निखळ हास्य फुलवणं या एका निस्वार्थ भावनेनं प्रवीण तुळपुळे यांनी सुरू केलेला हा प्रवास आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. मेडिकल क्लाउन ही संकल्पना नेमकी काय? नेव्ही ते विदूषक होण्यापर्यंतचा त्यांचा असामान्य प्रवास आजच्या या भागात पाहू या.