पुण्याला विद्येचे माहेरघर म्हणतात यामध्ये पुण्यातील उत्तम अशा शैक्षणिक संस्थांचा मोठा वाटा आहे. अशीच एक महत्वाची संस्था म्हणजे डेक्कन एज्युकेशन सोसायटी. याच डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अनेक शैक्षणिक संकुलांपैकी एक म्हणजे नवीन मराठी शाळा. नवीन मराठी शाळेची स्थापना ४ जानेवारी १८९९ रोजी झाली. शनिवार पेठेत असलेल्या या शाळेला आता १२५ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्तचा हा विशेष भाग..#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #navinmarathishala #DeccanEducationSociety #historyofpune #marathischool