पुणे जसं ऐतिहासिक वाडे, जागांसाठी प्रसिद्ध आहे तसंच प्रसिद्ध आहे येथील वैशिष्ट्यपूर्ण मंदिरांसाठी. म्हणजे खुन्या मुरलीधर, डुल्या मारुती अशी अनेक वेगवेगळ्या नावांची आणि वेगवेगळे ऐतिहासिक संदर्भ असलेली मंदिरं पुण्यात आहेत. आज अशाच एका कोथरुडमधील वैशिष्ट्यपूर्ण मंदिराला आपण भेट देणार आहोत ज्याचं नाव आहे ‘झाकोबा मंदिर’