पुण्यातील प्रत्येक जागेला एक वैशिष्टपूर्ण नाव आहे या आणि त्या नावाला एक वेगळा अर्थही आहे. सदाशिव पेठेत असणारा ‘नागनाथ पार’ हा आपल्या सगळ्यांनाच माहितीये, तिथून आपल्यापैकी अनेक जण नेहमी जातात. जसा शनिपार आहे तसाच हा नागनाथाचा पार आहे. पण हा नागनाथ कोण? त्याच्या नावाने पार का बांधला? असा प्रश्न आपल्याला क्वचितचं पडला असेल. आज ‘गोष्ट पुण्याची’च्या भागातून नागनाथ आणि त्याच्या पाराची गोष्ट आपण जाणून घेणार आहोत..