आपला इतिहास.. आपली संस्कृती आणि आपले प्राचीन साहित्य हे किती मौल्यवान आहे हे काही वेगळं सांगायला नको. आयुर्वेद असो की खगोलशास्त्र; आपल्या प्राचीन साहित्याचा वापर आपल्याला आताच्या आधुनिक युगातही कायम होतो. पुण्यातील ‘भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर’ ही भारतातील अशीच एक संस्था. इथे अनेक हस्तलिखिते आणि दुर्मिळ पुस्तकांचा मोठा संग्रह आहे. आज ‘गोष्ट पुण्याची’च्या भागात याच भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेला आपण भेट देणार आहोत