पुण्यातील प्रमुख रस्त्यांपैकी एक रस्ता जे. एम. रोड. आता दररोज या जे. एम. रोडने जाणाऱ्यांपैकी किती लोकांना जे. एम. रोड म्हणजे जंगली महाराज रस्ता आहे हे माहीत आहे हा संशोधनाचा विषय. गंमतीचा भाग सोडला तर या रस्त्याला हे नाव ज्यामुळं मिळालं ती जागा म्हणजे इथे असणारं जंगली महाराज मंदिर. आज ‘गोष्ट पुण्याची’च्या भागात आपण या मंदिराला भेट देऊन.. जंगली महाराज कोण होते? त्यांचं काम नेमकं काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत..