पुण्याची पारंपरिक बाजारपेठ म्हणजे ‘तुळशीबाग’. या तुळशीबागेत अगदी स्वयंपाकघरातील वस्तूंपासून ते अगदी भातुकलीच्या खेळणीपर्यंत सगळं मिळतं हे आपल्याला माहिती आहे. पण या तुळशीबागेत एक सुंदर आणि भव्य पेशवेकालिन राम मंदिर आहे ते तुम्हाला माहिती आहे का? ‘गोष्ट पुण्याची’च्या या भागात याच राम मंदिराचा इतिहास, माहिती आपण जाणून घेणार आहोत