पाणी म्हणजे आपली मूलभूत गरज! आपल्या स्थानिक भागातील महापालिकेची, नगरपालिकेचीही आपल्याला आपल्या घरापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी व्यवस्था असते. पण साधारण अडीचशे ते तीनशे वर्षांपूर्वी पुण्यात एक अशी पाईपलाईन बांधली गेली होती जिचं पाणी थेट कात्रजच्या तलावातून शनिवारवाड्याच्या हौदापर्यंत यायचं आणि तेही जमिनीखालून.. ही अभिनव कल्पना कोणाची होती? हे अफाट तंत्र नेमकं साधलं कसं गेलं होतं? हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर हा भाग नक्की बघा..