बाजीरावांच्या बहिणीच्या स्मरणार्थ बांधलेले १८व्या शतकातील अमृतेश्वर मंदिर व समूह| गोष्ट पुण्याची- ८९
पुणे जसं ऐतिहासिक वाड्यांसाठी ओळखलं जातं तसंच ते इथल्या ऐतिहासिक जुन्या मंदिरांसाठीही ओळखलं जातं. आज पुण्याचा विस्तार, इथलं औद्योगीकरण जरी वाढलं असले तरी इथली काही मंदिरं पुण्याच्या श्रीमंतीचा आणि ऐतिहासिक वारशाचा दाखला देत आजही उभी आहेत. आज ‘गोष्ट पुण्याची’च्या भागात आपण पेशवेकालीन अमृतेश्वर मंदिर समूहाला आपण भेट देणार आहोत आणि इथल्या काही वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आणि याचा इतिहासही जाणून घेणार आहोत.