‘गदिमां’च्या सुरेल आठवणी जपणारं त्यांचं निवासस्थान पंचवटी!| गोष्ट पुण्याची भाग-१०१ | G.D.Madgulkar
‘नाच रे मोरा’ सारखं बालगीत असो किंवा ‘कानडा राजा पंढरीचा’ सारखं भक्तीगीत असो; कविवर्य ग. दि. माडगूळकर हे नाव मराठी माणसाच्या मनात कायमस्वरूपी असेल यात शंका नाही. ‘गदिमां’च्या गीतरामयणासारख्या रचनेमुळं त्यांना आधुनिक वाल्मिकी म्हणूनही संबोधलं जाऊ लागलं. नुकताच म्हणजे १ ऑक्टोबरला गदिमांचा जन्मदिवस झाला त्याचंच निमित्त साधत आज ‘गोष्ट पुण्याची’च्या भागात आपण गदिमांचे निवासस्थान असलेल्या ‘पंचवटी’ ला भेट देणार आहोत.