रहाळकर राम मंदिरातील वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आणि इतिहास!| गोष्ट पुण्याची -१०३|Rahalkar Ram Mandir Pune
रामनवमी असली की पुणेकर सदाशिव पेठेतील एका मंदिरात आवर्जून दर्शनासाठी येतात ते मंदिर म्हणजे रहाळकर राम मंदिर. जवळपास १८३ वर्षांपूर्वीचं हे मंदिर आणि या मंदिरातील वैशिष्ट्यपूर्ण असलेली रामाची मूर्ती हा औत्सुक्याचा विषय आहे. आपण आजवर रामाची मूर्ती ही राम-लक्ष्मण-सीता अशी पाहिली असेल, पण इथली मूर्ती काहीशी वेगळी आहे. या ‘गोष्ट पुण्याची’च्या भागात रहाळकर राम मंदिराला भेट देऊयात आणि त्याचा इतिहास जाणून घेऊयात..