बाजीरावांनी मस्तानीसाठी उभारलेल्या महालाचं विलोभनीय रूप आणि इतिहास |गोष्ट पुण्याची-१०४|Mastani Mahal
पुण्याच्या इतिहासाचा उल्लेख आला की थोरले बाजीराव पेशवे हे नाव घ्यावंच लागतं. बाजीरावांची कारकीर्द अभ्यासली तर त्यातील एक पान म्हणजे त्यांची दुसरी पत्नी मस्तानी. याच मस्तानीसाठी बाजीरावांनी कोथरूड भागात ‘मस्तानी महाल’ बांधला होता. चला तर ‘गोष्ट पुण्याची’च्या या भागात मस्तानी महालला भेट देऊयात आणि त्याची गोष्ट जाणून घेऊयात..