पुण्यातील भिडे पुलाच्या नावामागचा बाबाराव भिडेंचा इतिहास ! | गोष्ट पुण्याची-१०८ | Baba Bhide Bridge
पुण्यात पावसाळा आला की दोन प्रश्न प्रत्येक पुणेकरांना पडतातच. त्यातला एक म्हणजे फिरायला कुठे जायचं? आणि दूसरा म्हणजे, तो भिडे पूल पाण्याखाली गेला का? गंमतीचा भाग सोडला तर खरोखर पुण्यातील भिडे पुलाची फक्त पुण्यात नाही तर पुण्याबाहेरही चर्चा आहे.पण, ज्यांचं पुलाला नाव आहे ते भिडे होते कोण? आणि त्यांचं नाव पूलाला का दिलं गेलंय? हा पूल नेमका कधी बांधला गेला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आजच्या ‘गोष्ट पुण्याची’च्या भागातून जाणून घेऊयात..