नमस्कार गोष्ट पुण्याची या लोकसत्ता ऑनलाइनच्या विशेष मालिकेत तुम्हा सर्वांचं स्वागत. पुण्यातील शुक्रवार पेठेतील भाऊ महाराज बोळातून शारदा गणपती मंदिराकडे जाताना डाव्या हाताला जुन्या विटांच्या बांधकामाची श्री ‘ज्ञानेश्वरी वाचन मंदिर‘ असं नाव असलेली पाटी दिसते. ही जागा नेमकी आहे काय? मंदिर आहे की वाचनालय? आज ‘गोष्ट पुण्याची‘च्या भागात श्री ज्ञानेश्वरी वाचन मंदिर म्हणजेच नाना महाराज साखरे मठाला भेट देऊयात..