पुणे हे भारतातील एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. येथील ऐतिहासिक वास्तू, सांस्कृतिक बाबींमुळे या शहराची एक आगळी वेगळी ओळख आहे. पूर्वीच्या काळी पुण्यातील एसपी कॉलेजजवळ एक खजिना विहीर होती. आता ‘खजिना विहीर’ असं नाव ऐकलं की साहजिकच आपल्या मनात प्रश्न पडतो की खजिन्याने भरलेली विहीर असेल की काही अजून काही वेगळं? चला तर आजच्या ‘गोष्ट पुण्याची’च्या भागात या जागेला भेट देऊन इतिहास जाणून घेऊयात…