भोलेनाथ
अशा अनेक अनेक कथा आणि प्रसंग आहेत जे घडले कैलास पर्वताच्या दक्षिण भागात. सर्व प्रकारचे लोक, त्यांनी शिवाकडून, सर्व प्रकारच्य उत्तम गोष्टी मिळवल्या. जग असा विचार करायचं की या लोकांची या गोष्टी मिळवण्याची लायकी नाहीये. पण, शिवानं तसा कधी भेदभाव केला नाही. जेव्हा केव्हा त्यांनी जे काही विचारलं ते ते त्यांना दिलं. तुम्हा सर्वांना भस्मासुर महितीये? तर, हा एक योगी आहे, जो येतो, आणि शिवाला म्हणतो, की त्याला अशी एक सिद्धी हवीये की, ज्या कोणाला तो स्पर्श करेल, ते भस्म होऊन त्यांची राख होईल. शिव म्हणतो ठीक आहे, घेऊन टाक. मग त्या माणसाला, शिवाच्याच डोक्यावर हात ठेवायचा असतो. त्याला करून पहायचं असतं की शिवावर हे काम करतं का नाही?