पिंपल्स ही खुप सामान्य समस्या आहे. जी मोठ्या प्रमाणात टिनएजर्समध्ये दिसते. तरुणपणात काही हार्मोनल बदल होत असतात. यामुळे चेहर्यावरील तेलीय ग्रंथी जागृत होतात आणि या ग्रंथींवर बॅक्टेरिया अटॅक करतात. कोणत्याही व्यक्तीचा चेहरा कितीही सुंदर असता तरी चेहऱ्यावर मुरमे आल्यावर अनेकदा चेहऱ्यावर कायमचे डाग राहाण्याची शक्यता असते. त्यासाठी योग्य वेळीच चेहऱ्यांवरील मुरुमांचा बंदोबस्त केला पाहिजे. सूर्यप्रकाशामुळे त्वचा काळवंडण्यापासून अनेक प्रकारचे त्रास होतात. पण सूर्यप्रकाश मुरुमांसाठी उपयुक्त असतो. सूर्यप्रकाशामुळे मुरुमांमधील जंतुसंसर्गाचे प्रमाण कमी होते. मुरुमांचा त्रास सुरू झाला तर तात्काळ उपचार सुरू करण्याची गरज आहे. अन्यथा मुरुमांचे डाग आयुष्यभर चेहऱ्यावर मिरवावे लागतात. पिंपल्स का येतात? आणि त्यावर उपाय काय? हे आपण आज पाहुयात.