आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या त्रासांमध्ये अॅसिडिटी किंवा आम्लपित्ताचा विकार सामान्य झाला आहे. २० वर्षावरील प्रत्येकालाच अॅसिडिटीचा हा त्रास कधी ना कधी होतोच. अनियमित जेवण हे अॅसिडिटीचं मुख्य कारण आहे. अशात जर गॅसेस आणि वाताचा त्रास सुरू झाला तर शरीरात समस्याच समस्या सुरू होतात. डोकेदुखई, कंबर दुखी, पोटदुखी, छातीत जळजळ सारख्या समस्या त्यामुळं सुरू होऊ शकतात. तर आज आपण जाणुन घेणार आहोत अॅसिडिटी विषयी..