सध्याच्या तरुणाईमध्ये टॅटूची प्रचंड क्रेझ आहे. अनेकांना टॅटू काढणं म्हणजे फॅशनचा एक भाग वाटतो. टॅटू करणे हे आतापासून नव्हे तर पूर्वीच्या काळापासून चालत आलेली प्रथा आहे. पूर्वी लोक आपले नाव हातावर गोंदवून घ्यायचे, आता हे गोंदवणे लांब राहील आणि त्यालाच नाव टॅटू हे नाव देऊन प्रोफेशनल बिझनेस सुरु केलं आहे. आणि सध्याची तरुणाई मध्ये हे खूपच ट्रेंडिंग झालं आहे. आजच्या जागतिक टॅटू दिनानिमित्त आपण टॅटू काढून घेताना काय काळजी घेतली पाहिजे याचसंदर्भात बोलणार आहोत.