साधारणपणे नवव्या दहाव्या वर्षी मुलं अडल्ट कंटेंट बघायला लागतात, असं विविध अभ्यासातून समोर आलं आहे. नंतर वय वाढतं त्यानुसार पॉर्न कंटेट बदलत जातो. मुलं पॉर्न बघताना दिसली की पालकांची पहिली प्रतिक्रिया आरडाओरड करण्याची असते. पण पॉर्नविषयी मुलांशी बोलणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांना गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभं करण्याऐवजी त्यांच्याशी संवाद साधणं आवश्यक आहे. वेगवेगळ्या वयोगटातील मुलांशी काय बोलायला हवं, लैंगिक शिक्षण कसं द्यायला हवं, हे सांगतायत समाजमाध्यमांच्या अभ्यासिका मुक्ता चैतन्य…