कुणी न्यूड किंवा सेमी न्यूड फोटो पाठवायला सांगितलं किंवा व्हायरल करायला मुलांना सांगितलं तर तो एक मोठा धोका आहे हे लक्षात घ्या. घटना घडून गेल्यावर सांगण्यापेक्षा काय धोके असतात हे मुलांना आधीच सांगितलं तर त्यांना वाचवता येणं शक्य आहे. ऑनलाइन मीडियामध्ये अनोळखी व्यक्ती मुलांना नादी लावू शकतात. त्यांच्याकडून कौटुंबिक माहिती, फोटो, व्हिडीओ आदी गोपनीय माहिती मिळवू शकतात. इतकंच नाही तर पिडोफिलियानं ग्रस्त माणसंही ऑनलाइन विश्वात असतात, जी मुलांचं लैंगिक शोषण करू शकतात… काय आहेत ऑनलाइन विश्वातले रेड अलर्ट्स? सांगतायत समाजमाध्यमांच्या अभ्यासक मुक्ता चैतन्य…