सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. करोनाचा आलेखही वर खाली होत असल्याचं दिसून येत आहे. कधी अचानक करोनाबाधितांची संख्या अधिक असते तर कधी त्यांच्या तुलनेत कमी प्रमाणात करोनाबाधित आढळून येतात. अशा परिस्थितीत करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देशांमध्ये लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहे. अशातच अनेकांना ही लस नक्की येणार तरी कधी हा प्रश्न नक्कीच पडलाय. करोनावरील लस नक्की केव्हा उपलब्ध होईल याचं उत्तर या महिन्याच्या अखेरीस मिळण्याची शक्यता आहे.