कोणताही चटकदार पदार्थ करायचा असेल तर त्यावर कढीपत्त्याची फोडणी ही हवीच. त्यामुळे बऱ्याच गृहिणी स्वयंपाक करताना भाजी, आमटीमध्ये कढीपत्त्याच्या पानांचा वापर करतात. कढीपत्त्यामुळे जशी जेवण्याची चव वाढते. त्याचप्रमाणे तो शरीरासाठीदेखील तितकाच गुणकारी आहे. त्यामुळे कढीपत्ता खाण्याचे १० गुणकारी फायदे कोणते ते जाणून घेऊयात.